Sheli Mendhi Palan Yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील धनगर आणि तत्सम समाजातील सुमारे 1 लाख मेंढीपालन कडून शेळी मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो .मेंढी पालन करणारा समाज आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून मेंढीपालन करिता आवश्यक असणाऱ्या चार्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून भटकंती करून मेंढी पालन करत आहे आपण तर बघतच असाल राज्यातील मेंढी पालन व्यवसायामध्ये होणारी घट ही खूपच वेगाने वाढत जात आहे या व्यवसायामध्ये घट होण्याची कारणे आणि यावरती उपाय म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने शेळी व मेंढी पालन या योजनेची सुरुवात केलेली आहे. ही योजना धनगर समाजातील नागरिकांकरिता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण अशी योजना ठरणार आहे. शासन मार्फत सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमार्फत समाजातील मेंढी पालन व्यवसायाला चालना मिळणार आहे .त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Sheli Mendhi Palan Yojana 2024 वैशिष्ट्ये काय आहेत ?
- महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या शेळी मेंढी पालन योजना करिता पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- केंद्र प्रशासन तसेच महाराष्ट्र शासन या विविध योजने प्रमाणे मध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना डीबीटी च्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे .Sheli Mendhi Palan Yojana 2024
- या शेळीपालन योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही कारण हे फॉर्म तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
- म्हणून शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो त्यामुळे अर्जदार आपल्या घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून या योजनेचा अर्ज करू शकतात.
- अर्ज आपण स्वतः घरीबसल्या ऑनलाइन पद्धतीने भरू शकणार म्हणून अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या परत परत फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही .
- अर्जदाराने अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंतची अर्जाची सर्व माहिती अर्जदारला वेळोवेळी प्राप्त होईल त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोन्ही बचत होईल आणि धावपळ देखील होणार नाही.Sheli Mendhi Palan Yojana 2024
- या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याचे थेट बँक द्वारे डीबीटी च्या माध्यमातून जमा होईल.
Sheli Mendhi Palan Yojana 2024 फायदे काय आहेत ?
- शेळी व मेंढी पालन योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी पशुपालक नागरिक यांच्या शेळी मेंढीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते .
- बेरोजगार तरुणांना यामधून स्वतःचा जमीन नवीन व्यवसाय सुरू करता येईल आणि अन्य नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतील बेरोजगार तरुणांना यामधून स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करता येईल.
- राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या या योजनेचा मोठा फायदा होणार आहे राज्यात औद्योगिक विकास शेळीपालन योजना महत्त्वाची ठरत आहे.
- राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे राज्यातील पशुपालकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा उद्देश आहे .
- या व्यवसायामुळे शेळीचे दूध व लोकर उत्पादन भरघोस वाढवण्याची मदत होईल शेती म्हणून हिला जोडधंदा म्हणून शेळीपालन केले तर शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होईल.

अश्याच नवनवीन महितीसाठी आताच जॉइन करा: WhatsApp Group
Sheli Mendhi Palan Yojana 2024 उद्दिष्टे काय आहेत ?
- या योजनेचे उद्दिष्टे पशुपालनासाठी प्रोत्साहन देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे हे आहे.
- पंचायत समिती शेळीपालन योजना सामान्यातून ही तुम्ही शेळीपालन योजना सुरू करू शकता .
- राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे पशुपालकांचा सामाजिक आर्थिक विकास करून त्यांना सक्षम बनवणे .
- पशुपालकांना शेळी व मेंढ्या खरेदीसाठी लागणाऱ्या पैशासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत करणे .
- राज्यातील दूध आणि मांस यांच्या उत्पादनात वाढ करणे बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभा करणे .
- आणि त्यांना आर्थिक विकास करणे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणे शेळीपालन या पारंपरिक त्याला देणे.
Sheli Mendhi Palan Yojana 2024 कशाप्रकारे प्राधान्य दिले जाते ?
- या योजने मध्ये जर तुम्ही पशुपालन प्रशिक्षण घेतले असेल तर ते कमी येणार आहे. कारण राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पशुपालन प्रशिक्षण घेतलेले आहे अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
- राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासह या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येते अल्प व अत्यल्प भूधारक एक हेक्टर पर्यंत शेतकरी यांनाही या योजनेसाठी प्राधान्य दिले जाते .
- अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत शेतकरी यांना ही या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाते याबरोबर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार या तरुणांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- तसेच राज्यातील महिला व बचत गटातील लाभार्थ्यांना योजनेला प्राधान्य दिले जाते .
- महाराष्ट्रातील राज्य राज्यातील शेतकरी पशुपालक व सामान्य नागरिक शेळीपालन कर्ज योजनेसाठी पात्र राहतील .
- महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले शेळीपालन कर्ज योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% व खुल्या प्रवर्गातील नागरिकांना 50% अनुदान दिले जाते .
- महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शेळीपालन योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
शेळी व मेंढी पालन योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शेळीपालन योजनेचा लाभ घेता येईल.
- राज्यबाहेरील नागरिकांनी अर्ज केल्यास तो रद्द केला जाईल या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारचे कुठल्याही शेळीपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
- ज्या व्यक्तीला पशुपालन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 9000 वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे.Sheli Mendhi Palan Yojana 2024
- जेणे करून या जमिनीवर 100 शेळ्या व पाच मेंढया राहू शकतील. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. कारण योजनेसाठी 18 वर्षे पूर्ण असलेला नागरिक सहभाग घेऊ शकतो.
शेळी व मेंढी पालन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल शेळी व मेंढी योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.Sheli Mendhi Palan Yojana 2024
- येथील डॅशबोर्डवर असलेला नवीन नोंदणी किंवा किंवा ऑनलाइन अर्ज यावर क्लिक करायचे आहे विचारलेले सर्व माहिती भरून द्यावी.
- त्यानंतर येथील विचारलेली सर्व माहिती भरून द्यावी लागेल आणि कागदपत्र करावीत संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज तपासून पहा .
- शेवटी सबमिट किंवा जमा करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता तसेच ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करू शकता .
- महाराष्ट्र सरकारच्या शेळीपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असाल तर पशुसंवर्धन विभागात गेल्यानंतर कृषी विभागातून शेळीपालन योजनेचा अर्ज घ्यावा .
- त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून पशुसंवर्धन विभागात जमा करावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा.Sheli Mendhi Palan Yojana 2024.
शेळी व मेंढी पालन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
शेळी व मेंढी पालन योजनेसाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
शेळी व मेंढी पालन योजनेसाठी पात्रता काय आहे ?
शेळी व मेंढी पालन योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पात्र आहेत.
हे पण बघा:
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; असा करा अर्ज : Mahamesh Yojana 2024|
