Saur Krushi Pump Yojana 2024: सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाकडून महाराष्ट्रामध्ये सन 2015 पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सध्या प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यात येत आहेत राज्यांमध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2024 पर्यंत 2 लाख 63 हजार 156 सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना या सौरऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंप बद्दल शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

Saur Krushi Pump Yojana 2024 या शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रथम प्राधान्य :
Saur Krushi Pump Yojana 2024 या शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रथम प्राधान्य: राज्य सरकारच्या सन 2024 च्या अर्थसंकल्पनेमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यांमधील जवळपास आठ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलार पंप देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. या आधी पीएम कुसुम योजनेअंतर्गत ही योजना राबवली जात होती. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून सौर पंपाची मागणी केली जात होती ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनासाठी पारंपारिक पद्धतीने वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात सौर कृषी पंप प्रस्थापित करण्यात येणार आहेत. महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
Saur Krushi Pump Yojana 2024 या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहे ?
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- अर्जदार स्वतःचे जमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदार यांचा/ मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक
- पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकार
- संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता
- पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना,योजनेचे उद्देश :
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी फक्त 10% रक्कम भरून मिळणार सौर पॅनल्स आणि कृषी पंपाचा पूर्ण संच.
- अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिसा 5% असणार आहे.
- उर्वरित रक्कमेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे.
- जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एचपी चे पंप मिळणार आहेत.
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी इन्शुरन्स सह दिले जाणार आहे.
- विज बिल नाही लोडशेडिंगची चिंता असणार नाही.
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी: Join My WhatsApp Group
या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष :
2.5 एकर पर्यंतचे जमीन धारक शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषी पंप, 2.51 ते पाच एकर पर्यंत शेत जमीन धारक शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि पाच एकर वरील शेत जमीन धारक शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जाणार आहे. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाचे मागणी केल्यास तो देखील बंधनकारक राहील
वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेत जमीन धारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर आणि नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे किंवा नाही याची खात्री महावितरण द्वारे करण्यात येईल. तसेच जलसंधारण करणार्या पाणी जिरवणे या पाहण्यानसाठी व मधून पाणी उपसण्यासाठी हे पंप वापरता येणार नाहीत. अटल सौर कृषी पंप योजना एक, अटल सौर कृषी पंप योजना दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.(Saur Krushi Pump Yojana 2024 या शेतकऱ्यांना दिले जाणारे प्रथम प्राधान्य )
या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.
- किंवा या योजनेच्या अधिकृत लिंक वरती जाऊन शेतकरी अर्जदारांना A1 अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अगदी साधी आणि सोपी असून अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
वरती सांगितलेल्या सर्व कागदपत्राची आवश्यकता मागेल त्यांना सोलर पंप या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना ही कागदपत्रे घेऊन ऑनलाईन अर्ज करता येईल. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा वापर केला तर काही दिवसात त्यांना सिंचन उपलब्ध करून देणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे देखील सोलार पंप योजना साठी अर्ज करू शकतात. राज्य सरकारच्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे.
Saur Krushi Pump Yojana 2024 या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत :
- Saur Krushi Pump Yojana 2024 सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला समजेल की डिझेल पंप नवीन किंवा बदलण्याची विनंती अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती. अर्जदाराचे पूर्ण नाव आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा पर्याय वर क्लिक करायचे आहे.
- रजिस्टर वरती क्लिक करून ओटीपी पेज वरती पोहोचा.
- तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ओटीपी आला असेल तो तिथे टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमचा ओटीपी परत एकदा चेक केला जाईल तुम्हाला तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- यानंतर तुमच्यासमोर महाऊर्जा कुसुम सौर पंप योजना लॉगिन पेज उघडेल.
- येथे तुम्हाला तुमचा वापर करता इत्यादी पासवर्ड आणि लॉगिन प्रविष्ट करावे लागेल भरलेली सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी.
- त्यानंतर तुम्हाला कम्प्लीट मदतीचा हात यूजर फॉर्म गो अहेड या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आपल्या कुटुंबातील श्रोत आणि सिंचन स्वतःची माहिती आवश्यक पंपांची माहिती बँकेची माहिती येथे भरावी लागेल तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील त्यानंतर तुम्हाला अंतिम घोषणा द्यावी लागेल
- यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक संदेश प्राप्त होईल वरील संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराला सौर कृषी पंपासाठी कोटेशन प्राप्त होईल तुम्हाला कोटेशन परत एकदा तपासून घ्यावे लागेल त्यानंतर परत एकदा माहिती तपासावी.
- त्यानंतर तुम्हाला मनी या पर्यावरती क्लिक करावे लागेल अर्जदार तीन पद्धतीद्वारे रक्कम भरू शकतात ऑनलाइन डीडी आणि चलन यापैकी एक पद्धत निवडून पेमेंट करावे.
FAQ :
या योजनेचे उद्देश काय आहेत ?
सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी फक्त 10% रक्कम भरून मिळणार सौर पॅनल्स आणि कृषी पंपाचा पूर्ण संच
या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
या योजनेअंतर्गत नवीन सौरभ कृषी पंप योजना सलाम मिळवण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.
हे पण बघा:
