PM Suryaghar Yojana 2024: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना? घरगुती सौर ऊर्जा वापरासाठी सरकार देते अनुदान; पहा संपूर्ण माहिती?

PM Suryaghar Yojana 2024: भारत सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेद्वारे सामान्य कुटुंबांना सौरऊर्जा वापरून वीज मोफत मिळवण्याची संधी मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये ही योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ही योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी आर्थिक बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

PM Suryaghar Yojana 2024: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे उद्दिष्टे काय आहेत?

  1. सौरऊर्जेचा प्रसार करणे : आपण सर्वांना तर माहीतच आहे आजच्या काळात वीज निर्मितीसाठी प्रामुख्याने कोळसा, गॅस किंवा इंधनावर आधारित प्रकल्प वापरले जातात. हे स्त्रोत मर्यादित आहेत आणि पर्यावरणालाही मोठे नुकसान करतात. या योजनेद्वारे भारत सरकार घराघरात सौर पॅनेल बसवून सौरऊर्जेचा वापर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिते. सूर्यप्रकाश हा सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे त्याचा योग्य उपयोग करून प्रत्येक कुटुंब वीज निर्मितीत सहभागी होऊ शकेल.
  2. वीज खर्च कमी करणे : सामान्यतः शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबांना दरमहा वीजबिल भरताना आर्थिक ताण सहन करावा लागतो. ही योजना लागू झाल्यावर 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार असल्याने प्रत्येक घराचे वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात बचत होऊन ती रक्कम इतर गरजांसाठी वापरता येईल.
  3. ऊर्जा आत्मनिर्भरता साधणे : भारतासारख्या मोठ्या देशाला वाढत्या लोकसंख्येसाठी भरपूर वीज लागते. त्यासाठी आयात केलेल्या इंधनावर अवलंबून राहावे लागते. या योजनेमुळे भारत स्वतःची वीज स्वतः निर्माण करू शकतो आणि आयातीवरील खर्च कमी होईल. त्यामुळे देश ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल आणि भविष्यातील ऊर्जेच्या गरजा स्वदेशी तंत्रज्ञानातून पूर्ण करता येतील. PM Suryaghar Yojana 2024
  4. ग्रामीण भागातील सुविधा वाढवणे : ग्रामीण भागात अजूनही अनेक कुटुंबांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. या योजनेमुळे गावागावात छतावर सौर पॅनेल बसवता येतील. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी वीज सहज उपलब्ध होईल, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वीज मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील वीजसुविधेतील दरी कमी होईल.

अश्याच नवीन योजना जाणून घेण्यासाठी WhatsApp Group जॉइन करा.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे वैशिष्ट्ये काय?

  • प्रत्येक पात्र घरावर सौर पॅनेल बसवून देणे : या योजनेत पात्र कुटुंबांच्या घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवले जातील. घरगुती वापरासाठी आवश्यक ती वीज ही थेट त्या घरालाच मिळेल.
  • दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज : या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक पात्र घराला दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील कुटुंबांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी होईल. 300 युनिट हा सरासरी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी पुरेसा वापर आहे. PM Suryaghar Yojana 2024
  • सोपी आणि पारदर्शक अर्ज प्रक्रिया : या योजनेसाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पोर्टलवर (pmsuryaghar.gov.in) उपलब्ध आहे. नोंदणीपासून ते कागदपत्र अपलोड करण्यापर्यंत सर्व टप्पे डिजिटल आहेत.
  • केंद्र सरकारकडून दिले जाणारे अनुदान (सब्सिडी) हे थेट Direct Benefit Transfer (DBT) द्वारे लाभर्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते. PM Suryaghar Yojana 2024
  • सरकार सौर पॅनेल बसवण्यासाठी 40% ते 60% पर्यंत अनुदान देते. उदाहरणार्थ – जर एखाद्या घराने 2 किलोवॅट क्षमतेचा सोलर पॅनेल बसवला तर 40% खर्च सरकार उचलते; 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पॅनेलसाठी 60% पर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे कुटुंबाला कमी खर्चात सौरऊर्जा मिळते.
  • ही योजना भारतातील सर्वात मोठी सौरऊर्जा मोहीम ठरणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे फायदे?

  1. या योजनेच्या माध्यमातून लाभर्थ्यांना मोफत वीज भेटेल म्हणजेच 300 युनिट पर्यंत वीज वापरावर कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. PM Suryaghar Yojana 2024
  2. महिन्याला येणारे बिल वाचेल म्हणजेच सरासरी घराला दरमहिना ₹1,000 ते ₹1,500 वीजबिल येत त्या येणार्‍या विजबिल ची बचत होईल.
  3. या योजनेमुळे लाभर्थ्याला दीर्घकालीन फायदा होईल म्हणजे एकदा घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले की ते 20 ते 25 वर्षे टिकतात. म्हणजे एकदा केलेला छोटासा खर्च अनेक वर्षे वीजबिलमुक्त जीवन देतो. यामुळे कुटुंबाला दीर्घकालीन आर्थिक फायदा मिळतो आणि सतत बचत होत राहते. एकदा सोलर पॅनेल बसवले की 20-25 वर्षे मोफत/स्वस्त वीज मिळेल.
  4. हे सोलार पर्यावरणपूरक आहेत यामुळे पर्यावरणावर कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होत नाही व प्रदूषण न करता वीज निर्मिती होते.PM Suryaghar Yojana 2024
  5. या योजनेचा शेतकर्‍यांना देखील फडा होणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज भेटेल. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी विजेची मोठी गरज असते. सौर पॅनेल बसवल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत व अखंड वीज मिळू शकते.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी पात्रता?

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराचे स्वतःच्या घराचे छत (Roof) असणे आवश्यक.
  • लाभार्थी किंव्हा लाभार्थयाचे कुटुंबाने आधी इतर सौर योजना घेतलेली नसावी.
  • ही योजना फक्त घरगुती वापरासाठी लागू होईल (व्यवसायासाठी नाही).
  • घराचे वीज कनेक्शन वैध असावे.
  • ही सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. PM Suryaghar Yojana 2024

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  1. आधार कार्ड
  2. ओळखपत्र (PAN कार्ड / मतदार ओळखपत्र)
  3. रहिवासी दाखला
  4. घराची मालकीची कागदपत्रे
  5. वीज बिलाची प्रत
  6. बँक पासबुक (DBT साठी)
  7. फोटो (पासपोर्ट साईज)

हे पण बघा: Modi Awas Gharkul Yojana 2024; मोदी आवास घरकुल योजना : कोणती कागदपत्रे लागतील? बघा संपूर्ण माहिती.

अर्ज कसा करावा?

खाली दिलेली संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन, सोपी आणि पारदर्शक आहे. त्यामुळे अर्जदारला कुठेही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही.

  1. सर्वात आधी अर्जदाराने केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. www.pmsuryaghar.gov.in
  2. त्या नंतर पोर्टलवर जाऊन आपला Mobile Number व Email ID टाकून नोंदणी करा. दिलेल्या mobile Number वर एक OTP येईल त्या OTP द्वारे तुमची ओळख पडताळली जाईल. PM Suryaghar Yojana 2024
  3. नोंदणी झाल्यावर तुमचे पोर्टलवर खाते तयार होईल. आता User ID आणि Password वापरून लॉगिन करून घ्या.
  4. आपल्या जिल्ह्याचा वीज वितरण कंपनीचा तपशील भरा. लॉगिन केल्यानंतर, अर्जदाराने आपल्या जिल्ह्याचे नाव (District) व आपल्या भागातील वीज वितरण कंपनी (DISCOM) निवडावी. PM Suryaghar Yojana 2024
  5. आता अर्जाचा मुख्य फॉर्म उघडेल. त्यामध्ये –वैयक्तिक माहितीजसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इ. भरून घ्या.
  6. त्या नंतर घराची माहिती जसे की छताची उपलब्ध जागा, वीज कनेक्शन क्रमांक हे व्यवस्तीतरित्या भरून घ्या.
  7. त्या नंतर बँक माहिती जसे की खाते क्रमांक, IFSC कोड इ. व्यवस्तीत व अचूक पणे भरा. वर दिलेली ही सर्व माहिती नीट भरावी. PM Suryaghar Yojana 2024
  8. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून घ्या. जसे की आधार कार्ड, घराचा मालकी हक्काचा पुरावा, वीज बिलाची प्रत आणि बँक पासबुकची प्रत.
    ही कागदपत्रे स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करावीत.
  9. भरलेला अर्ज व अपलोड केलेली कागदपत्रे एकदा नीट तपासून घ्या. व्यवस्तीत सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा.
  10. तुमचा अर्ज संबंधित विभाग तपासेल. मंजुरी मिळाल्यावर तुम्हाला SMS/Email द्वारे कळवले जाईल.
  11. अर्ज मंजूर झाल्यानंतर अधिकृत एजन्सी तुमच्या घरी येऊन छतावर सौर पॅनेल बसवेल.
  12. पॅनेल बसवल्यानंतर व त्याची तपासणीझाल्यानंतर केंद्र सरकारकडून मिळणारी अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. PM Suryaghar Yojana 2024

योजनेत वीज पूर्णपणे मोफत मिळेल का?

या योजनेत 300 युनिट पर्यंत वीज मोफत आहे. त्यापेक्षा जास्त वापरल्यास लाभर्थ्याला पैसे द्यावे लागतील.

भाड्याच्या घरावर अर्ज करता येईल का?

नाही, घराचे छत स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे.

या योजनेतून अनुदान किती मिळेल?

पॅनेलच्या क्षमतेनुसार सरकार 40% ते 60% पर्यंत अनुदान देते.

Leave a Comment