Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि कागदपत्रे बघा सविस्तर माहिती.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024: ही महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी राबवलेली एक महत्वाकांक्षी योजनाआहे. या योजनेमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना सरकारी कार्यालयांमध्ये काम शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी दिली जाते. म्हणजेच सरकारी नोकरी मिळण्यापूर्वीच सरकारी कामाचा अनुभव घेता येतो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेणार्‍या लाभर्थ्यांना कार्यालयीन अनुभव मिळतो आणि त्यांचा रोजगारासाठी आत्मविश्वास वाढतो.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. या योजनेचा प्रशिक्षण कालावधी हा साधारणतः 12 महिने (1 वर्ष) असतो. म्हणजेच एका वर्षात प्रशिक्षण पूर्ण होते आणि लाभार्थ्यांना कार्यालयीन अनुभव मिळतो व त्यांचा रोजगारासाठी आत्मविश्वास वाढतो.
  2. लाभर्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे ठिकाण हे जिल्हा, तालुका, विभागीय स्तरावरील सरकारी कार्यालये, प्रादेशिक कार्यालये किंवा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये लाभर्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
  3. योजनेच्या माध्यमातून किंवा योजनेचा लाभ घेत असताना मानधन दरमहा अंदाजे ₹10,000 ते ₹15,000 इतके दिले जाते.
  4. या योजनेच्या माध्यमातून लाभर्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण घेता येते.
    • प्रशासकीय व कार्यालयीन कामकाज
    • ई-गव्हर्नन्स व डिजिटल प्रशासन
    • लोकसंपर्क आणि प्रकल्प व्यवस्थापन
    • योजना अंमलबजावणी प्रक्रिया
    • कागदपत्र व्यवस्थापन, पत्रव्यवहार, नोंदी ठेवणे इ.

अश्याच नवनवीन माहितीसाठी join करा WhatsApp Group.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता काय?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची पात्रता

  1. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये बेरोजगार युवकांना प्राधान्य दिले जाते.
  2. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. राज्या बाहेरील अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
  3. या योजनेसाठी वयाची अट दिली आहे. उमेदवार वय हे 21 ते 35 वर्षे असावे. अर्जदार हा या वयोगटातील असावा.
  4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने 12 वी किवा पदवी (Graduation) किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  5. या योजनेसाठी निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे दिली गेली आहे. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
    • आधी ऑनलाईन अर्ज भरावा.
    • शैक्षणिक पात्रतेनुसार व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. आणि त्यांना संबंधित कार्यालयातून आदेश दिला जातो.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
    • निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारी कार्यालयात पाठवले जाते. उदा. जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, कृषि कार्यालये, पंचायत समिति इत्यादि.
  6. प्रशिक्षणानंतरची संधी:
    • या प्रशिक्षणात मिळालेल्या अनुभवा आधारे उमेदवारांना पुढील काळात सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी उपयोग होतो व त्यांना प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या प्रमाणपत्राचा देखील प्रभाव पडतो.
    • उमेदवारांना प्र्शिक्षणाच्या अनुभवामुळे पुढील काळात सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्राधान्य मिळू शकते.
    • या योजने अंतर्गत काही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना विभागा मार्फत नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जातात.
  7. प्रमाणपत्र:
    या योजने अंतर्गत जे प्र्शिक्षणार्थी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करतात त्या लाभर्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून “प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र” दिले जाते.

हे पण बघा : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना? घरगुती सौर ऊर्जा वापरासाठी सरकार देते अनुदान; पहा संपूर्ण माहिती?

आवश्यक कागदपत्रे काय?

  1. अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
    • आधार कार्ड
    • शिक्षण प्रमाणपत्रे
    • रहिवासी दाखला
    • पासपोर्ट आकाराचे फोटो
    • रोजगार नोंदणी क्रमांक (असल्यास

असा करा अर्ज:

  1. तुमचा फोन/कॉम्प्युटरवर ब्राउझर उघडा आणि MahaSwayam (राज्य रोजगार पोर्टल) शोधून त्याच्या Jobseeker/रोजगारार्थी भागात जा.
  2. “Register” किंवा “Jobseeker Registration” वर क्लिक करा.
  3. तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, आधार क्रमांक इत्यादी माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
  4. नोंदणी नंतर तुम्हाला एक रोजगार नोंदणी क्रमांक / user ID मिळेल — तो सुरक्षित ठेवा.
  5. दिलेल्या ID/पासवर्डने पोर्टलवर लॉगिन करा.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
  6. शिक्षण, पत्ता, कौशल्ये, बँक तपशील इत्यादी प्रोफाइलमध्ये पूर्ण करा.
  7. प्रोफाइल अधिकाधिक पूर्ण असणे आवश्यक असते त्यामुळे नंतर अर्ज करणे सोपे होते.
  8. पोर्टलवर “Schemes” किंवा “Training Schemes” मध्ये जा.
  9. “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” / CMYKPY शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  10. तुम्हा समोर फॉर्म दिसेल. येथील अर्ज फॉर्म सावधपणे भरा शालेय/कॉलेज तपशील, पत्ता, संपर्क माहिती, बँक तपशील इ.
  11. सर्व आवश्यक फील्ड्स भरून घ्या.
  12. फोटो आणि स्कॅन केलेले केलेले कागदपत्रे (आधार, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, बँक पासबुक पेज, फोटो) अपलोड करा.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
  13. आपलोड केलेल्या कागदपत्रांची फाइल फॉरमॅट आणि साइजच्या सूचना वाचा व त्यानुसार अपलोड करा.
  14. काही ठिकाणी “I agree” प्रकारचे डिक्लेरेशन असते ते वाचा आणि समंजसपणे टिक/स्वीकृती द्या.
  15. सगळे तपशील एकदा नीट वाचा जसे की नाव, आधार, बँक क्रमांक बरोबर आहेत का ते बघा.
  16. नंतर तुम्ही भरलेला फॉर्म “Submit” क्लिक करून जमा करा.
  17. फॉर्म सबमिट केल्‍यावर पोर्टलवरून कन्फर्मेशन येईल किंवा SMS/ई-मेल येईल.
  18. अर्ज क्रमांक/रसीदचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट काढून ठेवा.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024
  19. त्या नंतर निवड प्रक्रियेनुसार तुम्हाला फोन/ई-मेल/SMS द्वारे पुढील टप्प्याबाबत (मुलाखत/कागदपत्र पडताळणी/प्रशिक्षण सुरू) सूचित केले जाईल.
  20. योग्य वेळेवर कॉल/ईमेल तपासत रहा.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे फायदे काय आहेत?

  • शासन कार्यालयीन अनुभव मिळतो.
  • रोजगारासाठी आत्मविश्वास वाढतो.
  • प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान मिळते.
  • कौशल्यविकास, संवाद कौशल्य आणि वेळ व्यवस्थापन कौशल्य विकसित होते.
  • प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीच्या संधी वाढतात.

Leave a Comment