Modi Awas Gharkul Yojana 2024: सर्वांसाठी घरे – २०२४” : प्रत्येकासाठी घर मिळवून देण्याचा हा सरकारचा संकल्प आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर मिळावे, हा महत्त्वाकांक्षी संकल्प केला आहे. त्यासाठी घरकुल आवास ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून बेघगर लोकांना राहला स्वतःचे घर भेटणार आहे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील बेघर असलेल्या लोकांना घरकुल मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ (Modi Awas Gharkul Yojana 2024.)
- अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना सुरू केली गेली आहे. या योजनेचा लाभ पण लाभार्थी घेत आहेत.
- अनुसूचित जमातींसाठी शबरी आवास योजना आणि आदीम आवास योजना सुरू केली गेली आहे.
- विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि धनगर आवास योजना सुरू केली गेली आहे. भरपूर लाभार्थी या वरील योजनेचे लाभ घेत आहेत.
- मात्र, इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी अशी योजना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे, सरकारने २०२३-२४ साली मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत, इतर मागास प्रवर्गातील १० लाख घरे निर्माण करण्याचा उद्देश सरकारने समोर ठेवला आहे.

इतर मागास प्रवर्गातील (OBC) नागरिकांसाठी अशी योजना अस्तित्वात नव्हती ही उणीव लक्षात घेऊन, राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात एक नवा निर्णय घेतला. “मोदी आवास घरकुल योजना” नावाची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी येत्या तीन वर्षांत तब्बल १० लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
थोडक्यात, मोदी आवास घरकुल योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घरविहीन कुटुंबाला घर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. आधीच काही प्रवर्गांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू आहेत, आणि आता OBC समाजालाही स्वतंत्र घरकुल योजना मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वांसाठी घर हा संकल्प पूर्णत्वाकडे जात आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY ) काय आहे ?
भारत सरकारची प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही योजना गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही किंवा कच्च्या घरात वास्तव्य आहे, अशा कुटुंबांना पक्के घर मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे केवळ घर बांधून देणारी योजना नसून, “सर्वांसाठी घर” हा सरकारचा संकल्प पूर्ण करणारे एक मोठे पाऊल आहे. यामध्ये लोकांना कमी दरात कर्ज दिले जाते आणि या कर्जाची परतफेड करण्यासाठी 20 वर्षांपर्यंतचा कालावधी पण दिला जात आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दारिद्र्यरेषेखालील जे पण पात्र कुटुंब आहेत त्या पात्र कुटुंबांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये आहे, तेच कुटुंब यायेजनेसाठी अर्ज करू शकतात.Modi Awas Gharkul Yojana 2024
आवास योजनेची ठळक वैशिष्ट्ये ?
- घर बांधण्यासाठी आर्थिक मदत:
- पात्र कुटुंबांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी कर्ज दिले जाते.
- या कर्जावर सरकारकडून व्याज सबसिडी दिली जाते.
- व्याजावर सबसिडी
- गृहकर्जाच्या व्याजावर कमाल ₹2.67 लाखांपर्यंत सबसिडी मिळते.
- यामुळे कर्जाचा आर्थिक भार कमी होतो.
- कर्ज परतफेडीची सुविधा
- गृहकर्ज परतफेडीसाठी २० वर्षांपर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे.
- यामुळे कुटुंबांना सहजतेने कर्ज फेडता येते.
- लक्ष्यित लाभार्थी
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (BPL).
- शहरी व ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणारे नागरिक.
- ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपर्यंत आहे, अशा कुटुंबांना अर्ज करण्याची परवानगी आहे.

अश्याच नवनवीन माहिती साठी Join My WhatsApp Group
योजनेबद्दल माहिती.
| घटक | तपशील |
|---|---|
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G / PMAY-Rural) |
| सुरू केले | केंद्र सरकार (पंतप्रधान नरेंद्र मोदी) |
| लाँच दिनांक | २२ जून २०१५ |
| योजनेचे उद्दिष्ट | देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देणे |
| लाभार्थी | देशातील गरीब कुटुंबे, बेघर किंवा कच्च्या घरात राहणारे नागरिक |
| फेज 1 कालावधी | एप्रिल २०१५ – मार्च २०१७ |
| फेज 2 कालावधी | एप्रिल २०१७ – मार्च २०१९ |
| फेज 3 कालावधी | एप्रिल २०१९ – मार्च २०२५ |
| अंमलबजावणी मंत्रालय | गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय |
| सध्याची स्थिती | सक्रिय (चालू) |
PM आवास योजनेचे उद्दिष्ट्ये ?
योजनेची सुरुवात:
- सुरुवात: २०१५ साली केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली.
- लक्ष्य: देशभरात अंदाजे १.१२ कोटी पक्की घरे बांधणे. Modi Awas Gharkul Yojana 2024.
- आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, १ कोटी १ लाखाहून अधिक घरे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत.
प्रमुख उद्दिष्टे:
- प्रत्येकासाठी पक्के घर.
- भारतातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, टिकाऊ आणि स्वस्त घर उपलब्ध करून देणे.
- दारिद्र्य निर्मूलन.
- गरीब कुटुंबांना कच्च्या घरातून बाहेर काढून पक्क्या घरात आणणे. Modi Awas Gharkul Yojana 2024
- शहरी व ग्रामीण विकास.
- ग्रामीण भागात तसेच झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना चांगल्या सोयी-सुविधा असलेली घरे उपलब्ध करणे.
- आर्थिक सक्षमीकरण.
- घर बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणे. Modi Awas Gharkul Yojana 2024.
- यामुळे बेरोजगारी कमी होऊन देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणे.
- समावेशक विकास (Inclusive Growth).
- समाजातील दुर्बल, मागास आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घर मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे.
अपेक्षित परिणाम:
- शहर व गावात झोपडपट्ट्या किंवा कच्ची घरे कमी होतात.
- गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळते.
- जीवनमान सुधारते आणि सामाजिक सुरक्षितता वाढते.
लाभ कसा मिळतो?
- इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो.
- पात्रता तपासून लाभार्थ्यांची निवड केली जाते. Modi Awas Gharkul Yojana 2024.
- निवड झालेल्या कुटुंबांना कर्ज व सबसिडीच्या स्वरूपात मदत दिली जाते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा पुरावा
- पत्रव्यवहाराचा पत्ता
- जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- बँक खाते पासबुक
- फोटो
- मोबाईल नंबर
Modi Awas Gharkul Yojana Online अर्ज कसा करावा?
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://pmaymis.gov.in या वेबसाइटवर जा.
2. नागरिकांसाठी (Citizen Assessment) पर्याय निवड. होमपेजवर “Citizen Assessment” या मेनूमध्ये जा. तुमच्या श्रेणीनुसार योग्य पर्याय निवडा: For Slum Dwellers (झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी) किंव्हा Benefit Under Other 3 Components (इतर पात्र कुटुंबांसाठी)
3. आधार क्रमांक टाका: अर्ज करताना आधार क्रमांक अनिवार्य आहे.आधार नंबर टाकून पुढे “Check” वर क्लिक करा.
4. अर्ज फॉर्म भरा: तुमचे वैयक्तिक तपशील (नाव, पत्ता, जन्मतारीख इ.) भरा. कुटुंबाचे तपशील (कुटुंबातील सदस्यांची नावे, वार्षिक उत्पन्न, विवाहित/अविवाहित स्थिती). घराशी संबंधित माहिती (सध्या घर आहे का, किती खोल्या आहेत, कच्चे की पक्के घर). बँक तपशील (बँकेचे नाव, खाते क्रमांक). Modi Awas Gharkul Yojana 2024.
5. कागदपत्रे अपलोड करा:
अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात:
- आधार कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला॰
- रहिवासी प्रमाणपत्र.
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँक पासबुकची झेरॉक्स.
- पासपोर्ट साईज फोटो.
6. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून “Submit” बटणावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक (Application Number) मिळेल

अर्जाची स्थिती अशी तपासा ?
- नंतर वेबसाइटवर “Track Your Assessment Status” या पर्यायावर जाऊन तुमच्या अर्जाचा स्टेटस तपासू शकता.
- त्यासाठी अर्ज क्रमांक व आधार क्रमांक वापरावा लागतो.Modi Awas Gharkul Yojana 2024.
महत्वाची नोंद ?
- अर्ज फक्त ऑनलाईन करता येतो. Modi Awas Gharkul Yojana 2024
- जर अर्जदाराकडे इंटरनेटची सुविधा नसेल, तर जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन अर्ज करता येतो.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी Offline अर्ज कसा करावा?
- ओळखीचा पुरावा जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड.
- पत्त्याचा पुरावा. Modi Awas Gharkul Yojana 2024
- उत्पन्नाचा पुरावा जसे की फॉर्म 16, नवीनतम आयटी रिटर्न किंवा मागील सहा महिन्यांचे बँक खाते विवरण.
- शपथपत्र तुमचे किंवा तुमच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याचे भारतात कोणतेही घर
नसल्याचे. - खरेदी करायच्या मालमत्तेचे मूल्यांकन प्रमाणपत्र
- विकासक किंवा बिल्डरसोबत बांधकाम करार
- मंजूर बांधकाम योजना. Modi Awas Gharkul Yojana 2024.
आर्थिक स्तरानुसार पात्रता काय ?
PMAY योजनेत अर्जदारांचा समावेश खालील उत्पन्न गटांमध्ये केला जातो :
- EWS (Economically Weaker Section – आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट
वार्षिक उत्पन्न ₹३ लाखांपर्यंत असावे. - LIG (Lower Income Group – निम्न उत्पन्न गट
वार्षिक उत्पन्न ₹३ लाख ते ₹६ लाख दरम्यान असावे. - MIG-I (Middle Income Group – मध्यम उत्पन्न गट-I
वार्षिक उत्पन्न ₹६ लाख ते ₹१२ लाख दरम्यान असावे. - MIG-II (Middle Income Group – मध्यम उत्पन्न गट-II
वार्षिक उत्पन्न ₹१२ लाख ते ₹१८ लाख दरम्यान असावे.
2. घराशी संबंधित अट काय ?
- अर्जदाराकडे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
3. इतर अटी काय ?
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- महिला मालक म्हणून नाव ठेवणे आवश्यक आहे (घराचे मालकी हक्क पती-पत्नी संयुक्त नावाने किंवा स्त्रीच्या नावाने असणे बंधनकारक आहे). Modi Awas Gharkul Yojana 2024
- शहरी भागात २०११ च्या जनगणनेनुसार तयार केलेल्या यादीतील झोपडपट्टीतील रहिवासी पात्र आहेत.
- ग्रामीण भागात SECC-2011 (Socio-Economic Caste Census) यादीतील बेघर किंवा कच्च्या घरात राहणारे कुटुंब पात्र आहेत.
4. विशेष प्राधान्य लाभार्थी कोण ?
- विधवा / एकल माता
- अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST)
- इतर मागास वर्ग (OBC)
- महिला प्रमुख असलेली कुटुंबे
- दिव्यांग व्यक्ती
लाभार्थी यादी त तुमचे नाव कसे तपासायचे?
जर तुम्ही PMAY अर्बन सेगमेंट अंतर्गत अर्ज केला असेल तर खालील पायऱ्या फॉलो करा:
- pmaymis.gov.in ला भेट द्या
- ‘सिलेक्ट लाभार्थी’ वर क्लिक करा
- ड्रॉप डाउन मेनूमधून ‘नावानुसार शोधा’ वर क्लिक करा
- तुमचा आधार क्रमांक टाका. Modi Awas Gharkul Yojana 2024.
- तुमचे नाव यादीत असण्या साठी तुमचा आधार क्रमांक डेटाबेसमध्ये उपलब्ध असणे गरजेचे आहे
जर तुम्ही PMAY ग्रामीण विभागांतर्गत अर्ज केला असेल तर खालील चरणांचे अनुसरण करा:
- rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx ला भेट द्या
- तुमचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा
- प्रविष्ट केलेला नोंदणी क्रमांक लाभार्थी डेटाबेसमध्ये उपलब्ध असल्यास, तुमचा तपशील समोर दर्शविला जाईल.
- जर तुम्हाला नोंदणी क्रमांकाशिवाय शोधायचे असेल तर ‘प्रगत शोध’ वर क्लिक करा.
- हे तुम्हाला एका नवीन पृष्ठावर घेऊन जाईल जेथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक, पंचायत, नाव, बीपीएल क्रमांक आणि मंजुरी आदेशाचे तपशील प्रविष्ट करावे लागतील.
- निकाल पाहण्यासाठी सर्च वर क्लिक करा.Modi Awas Gharkul Yojana 2024.
आवास योजनेची ठळक वैशिष्ट्ये ?
घर बांधण्यासाठी आर्थिक मदत, व्याजावर सबसिडी, कर्ज परतफेडीची सुविधा.
घराशी संबंधित अट काय ?
अर्जदाराकडे भारतात कुठेही पक्के घर नसावे. अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
PM आवास योजनेचे उद्दिष्ट्ये ?
भारतातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, टिकाऊ आणि स्वस्त घर उपलब्ध करून देणे.
